गेल्या २४ तासात ८७ पोलिसांना करोनाची लागण

मुंबई :

गेल्या २४ तासात ८७ पोलीस करोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना करोना हा संसर्गजन्य रोग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास १७५८ पोलिसांना करोना झाल्याचे त्यांच्या तपासणी अहवालात उघड झाले आहे. या सगळ्या भयावह परीस्थीतीतही दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसात 200 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत.

आपल्या जीवावर बेतणारे काम पोलीस रात्रंदिवस करत आहेत. पोलिस हा एकमेव घटक आहे, जो सातत्याने सामान्य लोकांच्या, गर्दीच्या संपर्कात येत आहे. त्यांच्यापर्यंत काही प्रमाणात सोयीसुविधा पोहोचत असल्या तरीही अनेक पोलिसांना करोना झाल्याचे चित्र समोर आले आहे.

दिवसेंदिवस हा करोनाचा विळखा धडधाकट आणि दमदार पोलिसांना हॉस्पिटलची वाट दाखवत आहे. आतापर्यंत 18 करोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. यामध्ये ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन येथील महिला कॉन्स्टेबलचा समावेश होता. पोलिसांना कोरोना होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी लोक प्रार्थना करत आहेत. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*