कविता माझी-तुझी | कोरोना तू माणसाला बरंच काही शिकवलं..!

कोरोना तु माणसाला बरंच काही शिकवल

जे त्याच्या मनाला पटुनही त्याने कधीच नव्हत स्विकारल
पैसा, पद, प्रतिष्ठेपुढे त्याला काहिच नाही दिसलं.
पण जेव्हा विषय जीवनाचा आला तेव्हा ते सारं मातीमोलचं वाटलं…..
कोरोना तू माणसाला बरंच काही शिकवलं।।

तुझ्यां भीतीपोटी कोरोना, शहरं ओस पडली
अन गाव पुन्हा गजबजू लागली…..
मुलं घरी परतल्याने आईबाबांसाठी जणू दिवाळीच सुरु झाली.
घराघरातून नवनविन पकवानांची मेजवानी सुरू झाली.
पिझ्झा, बर्गरची चव घरातल्या भाजी-भाकरीनं घेतली.
कोरोना तू माणसाला बरंच काही शिकवलं।।

पाळणा घरातल्या चिमण्यांना त्याचे आईबाबा नव्याने उमगू लागले
नातवंडाच्या बागडण्याने सारं आंगण व्यापून गेले
आजीआजोबा मात्र… हे क्षण पुन्हा डोळ्यात साठवू लागले….
टीव्हीवर रामायण पुन्हा दिसू लागले
आणि चार भिंतींना खऱ्या अर्थाने घरपण आले
कोरोना तू माणसाला बरंच काही शिकवलं।।

कळत नकळत मग तो विचार करू लागला
शर्यतीच्या या युगात तो खरे जगणेच विसरून गेला
तेव्हा, कोरोना त्याला म्हणाला त्याला विसरून सर्वकाही थांबव स्वतःला
जिवन आहे तुझं प्यारं, सांभांळ तयाला
वेळ दे कुटुंबाला, वेळ दे नात्याला,
वेळ दे आरोग्याला, वेळ दे तुझ्यां छंदाला,
अन् वेळ दे मलाही। वेळ दे मलाही।।….

– सौ.प्रज्ञा सोमनाथ कोकरे , पुणे

ता. क. : तुमच्या कथा आणि कवितांना आम्ही देऊ आमच्या पोर्टलवर प्रसिद्धी आणि महिनाभरात सर्वाधिक वाचनीय ट्रेंडमध्ये राहिलेल्या कवी व लेखकांना आम्ही देऊ खास बक्षीस.

कविता पाठवण्यासाठी संपर्क :

विनोदकुमार सुर्यवंशी (कार्यकारी संपादक, कृषीरंग)

मो. 7875200902 (व्हाटस्अॅप)

Email : Suryvinod9@gmail.com

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*