स्वतंत्र ‘भिलप्रदेश’ ट्रेंडमध्ये; महाराष्ट्र, गुजरात, MP, राजस्थानच्या आदिवासींची मागणी

मुंबई :

आदिवासींसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. आदिवासीबहुल भागातील जिल्ह्यांना जोडून स्वतंत्र भिलप्रदेश बनविण्याची मागणी आज ट्विटर ट्रेंडमध्ये आहे.

आदिवासींना स्वतंत्र बेजेट असूनही या भागातील विकासाच्या प्रक्रियेने अपेक्षित वेग घेतलेला नाही. भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अनास्थेचा फटका या भागातील आदिवासींना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळेच अनेकदा आदिवासी बांधवांना आंदोलन किंवा प्रसंगी थेट बंड पुकारून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधावे लागत आहे. आताही सुमारे २० वर्षांनी स्वतंत्र भिलप्रदेशच्या मागणीसाठी आदिवासी समुदाय सक्रीय झाला आहे.

#WeWantSeprateBHILPRADESH असा ट्रेंड या समुदायाने सेट केला आहे. यावर अभ्यास असलेल्या व नसलेल्यांनीही मग यावर आपले विचार मांडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान या चार राज्यांतील आदिवासीबहुल भागाचे मिळून स्वतंत्र भिलप्रदेश बनविण्याची आणि या भागातील विकासाला गती देण्याची मागणी केली जात आहे.

राजस्थानातील डूंगरपुर, बांसवाड़ा, प्रतापगढ़, गुजरातमधील दाहोद आणि शेजारील आदिवासी जिल्हे, मध्यप्रदेश राज्यातील झाबुआ प्रांत आणि उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांचा मिळून स्वतंत्र राज्य करण्याची ही मागणी आहे.

जयस ही संघटना यासाठी सक्रियपणे काम करीत आहे. त्यांचा पाठिंबाही दिवसेंदिवस वाढत आहे. डॉ. हिरालाल अलावा यांच्यासह अनेक आदिवासी तरुण यासाठी लोकशाही पद्धतीने लढत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=PuRThvNz3Fc

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*