चीन- भारत तणाव; सैन्याची जमवाजमव झाली सुरु

दिल्ली:

साधारणपणे गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये तणाव होता. त्यादरम्यान काही छोट्या गोष्टी घडल्या ज्यातून तणाव निर्माण होऊ शकतो. याचे इतक्या लगेचच संघर्षात रुपांतर होईल असे कुणालाही वाटत नसताना लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पान्गोंग त्सो तलाव आणि गालवान खोऱ्याच्या परिसरात चिनी सैन्याची जमवाजमव सुरू असल्याचे आढळून आले आहे. यावरून चीन नेमकी कशाची तयारी करत आहे याचा अंदाज आला आहे. तेथील आसपासच्या लोकांशी संपर्क झाल्यावर त्यांनी सांगितले की, भारतीय सैन्याशी संघर्षाची चीनची भूमिका यातून दिसत आहे.

गेल्या दोन आठवड्यात सीमारेषेच्या जवळ काही मोठ्या आणि महत्वाच्या हालचाली आढळून आल्या आहेत.

  • गालवान खोऱ्याच्या परिसरात सुमारे 100 तंबू उभारले आहेत.
  • काही बांधकामासाठी लागणारी यंत्रसामुग्रीही या भागात आणली आहे.
  •  तसेच अजून काही युद्धसामुग्रीची जमावजमव केली जात आहे.

कुठून झाली सुरुवात :-

५ मे रोजी चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात तब्बल दोन्हीकडचे मिळून १०० च्या आसपास सैनिक जखमी झाले. मग अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करत तो तणाव टाळला.

9 मे रोजीही उत्तर सिक्कीम येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. पूर्व लडाखच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचेही गेल्या आठवड्याभरात समजले होते. पण पुराव्याभावी या घटनेचे भारताला समर्थन करता नाही आले. यानंतर भारतीय लष्कराकडून चीनने घुसखोरी केल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे.

चीनने गेल्या दोन आठवड्यात गालवान खोऱ्याच्या परिसरात सुमारे 100 तंबू उभारले आहेत. गेल्या आठवड्यात भारतीय स्थानिक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत भारताने पीपल्स लिबरेशन आर्मीने गलवान खोऱ्यात उभारलेल्या तंबूंना जोरदार आक्षेपही घेतला होता. तरीही चीनचे हे काम चालू आहे. त्यामुळे आता भारताने सुद्धा काही युद्धसामग्रीची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*