संगमनेरमध्ये आणखी एक करोनाचा बळी

संगमनेर :

संगमनेर तालुक्यात करोनाची दहशत वाढतच आहे. तालुक्यातील निमोन गावच्या आणि उपचारासाठी नाशिकमध्ये असलेल्या एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. उपचार चालू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. सदर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेले दोघेही जन करोनाबाधित असल्याचे अहवालात समोर आले आहे.

मृत झालेल्या व्यक्तीच्या आईसह पत्नीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती करोनाबाधित झाल्याचे कळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने निमोणच्या गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत निमोन या गावातील दोन जणांचा बळी करोनामुळे गेला आहे. तसेच आतापर्यंत संगमनेरमधील एकूण तिन जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. दिवसेंदिवस संगमनेरमध्ये करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. रुग्ण कमी होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीयेत. सदर दोन करोनाबाधित रुग्णांवर नाशिक येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*