युपीमधील कामगार हवेत तर राज्य सरकारची परवानगी आवश्यक : योगी

मुंबई :

काल रात्री उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘उत्तर प्रदेशमधील कामगारांना घरी जाण्यास भाग पडले, त्यांना वाऱ्यावर सोडले’ अशी टीका केली होती. त्यांनतर आता त्यांनी कामगारांसंबंधीत एक महत्वाचा आणि परिणामकारक निर्णय जाहीर केला आहे. यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं योगींनी स्पष्ट केलं आहे. (वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले)

ही माहिती देताना त्यांनी पुढे म्हटले आहे की, राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार आहे. काही राज्यांनी ज्या पद्धतीने मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आता सामाजिक सुरक्षा आणि विमा आश्वासन देणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी बोलत होते.

या गोष्टी केल्या योगींनी स्पष्ट :-

  • कोणत्याही राज्याला त्यांना नोकरी द्यायची असेल तर त्या राज्याने त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि आर्थिक अधिकारांची हमी देणे.
  • कामगारांच्या सामाजिक सुरक्षेची हमी देणे.
  • कामगारांच्या विमा काढून देणे.
  • कामगारांना न्यायचे असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*