रोहित पवारांचा अनोखा उपक्रम; गरजूंना मिळणार नोकऱ्या

अहमदनगर :

एका बाजूला सगळे जग करोनाने ठप्प झाल्यामुळे मोठमोठ्या कंपन्या कर्मचारी कपात किंवा पगार कपात करत आहेत तर दुसरीकडे युवा व कल्पक आमदार रोहित पवार हे लोकांना नोकऱ्या देणार आहेत. यापूर्वी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी रोजगार मेळावे घेत हजारो तरुणांना नोकरी दिली आहे. यावेळी तरुणांना कुठेही दूर नोकरीसाठी भटकंती करायची गरज नाही.

ज्या तरूणांचे रोजगार गेले आहेत. त्यांनी संपर्क कार्यालयात संवाद साधावा, आपला बायोडाटा देऊन नावनोंदणी करता येईल. त्यासाठी कर्जत तालुक्‍यात कर्जत शहर, मिरजगाव, राशीन आणि बारडगाव सुद्रिक येथे संपर्क कार्यालय सुरू केली आहेत. तेथे नोंदणी करता येईल. नावनोंदणी केलेल्या उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीकडे त्याचा बायोडाटा पाठविला जाईल. त्या कंपनीला उमेदवारीची माहिती देऊन संधी देण्याचे सूचविले जाणार आहे. जरी एखादा व्यक्ती अशिक्षित असेल किंवा त्याच्याकडे एखादी  कला असेल त्याला योग्य मार्ग दाखवून रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमदार पवार यांचा प्रयत्न आहे.

उद्योग- व्यवसाय बंद आहेत. काही लोक शहरे सोडून गावी आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. गावी आलेल्या लोकांना काय करावे हे सुचत नाहीये. कामाच्या आणि पैशाच्या चिंतेने तरूणांना ग्रासले आहे. जे मजूर आहेत, त्यांनाही उद्याची चूल कशी पेटवायची याची भ्रांत आहे. या संकटकाळात रोहित पवार लोकांच्या मदतीला धावून आले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*