राणेंनी राज्यपालांना केली ‘ही’ अजब मागणी..!

मुंबई :

भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची भेट घेत ‘करोनाचा सामना करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी’, अशी मागणी केली.

यावेळी त्यांनी ‘ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही’, असे म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य कसे चालवावे, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते.

तसेच आजपर्यंत या संकटकाळात जनतेला राज्य सरकारकडून काय मिळाले? असा सवाल करत ते म्हणाले की, आतापर्यंत राज्याला जे काही मिळालं ते केंद्राकडूनच. राज्याने काय दिलं? यांचं धोरण काय? सरकारी अधिकार्‍यांना, पोलिसांना कसं हाताळावं, त्यांना सुरक्षित कसं ठेवावं, याचा काहीही अभ्यास नाही. सगळा अनागोंदी कारभार राज्यात सुरु आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*