म्हणून महिलांनी खायचा असतोय शिंगाडा; मधुमेहींनाही उपकारक

थंडीत शिंगाडा बाजारात मिळतो. तसेच वर्षभर काही ठिकाणी याचे पीठही मिळते. शिंगाडा हा एक बहुगुणी अन्नपदार्थ आहे. मधुमेही रुग्णांनाही हा उपकारक आहे. जाणून त्या त्याचे फायदे.

शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप चांगले असते. यामुळे हाडे व दात मजबूत होतात.

गर्भवती असेलल्या महिलांनी शिंगाडा खाल्ल्यास गर्भपाताचा धोकाही कमी होतो. महिला आणि बाळ दोघांचे स्वास्थ्य चांगले राहते. तसेच शिंगाडा खाल्ल्याने पाळीसंबंधित समस्याही दूर होतात.

पायाच्या तळव्यांच्या भेगा असल्यास हे खाल्ल्याने त्या भरुन येतात.

शरीराच्या एखाद्या भागावर सूज आल्यास तिथे शिंगाड्याचा लेप लावावा.

जुलाब होत असल्यास शिंगाड्याच्या सेवनाने फायदा होतो.

शिंगाड्याचे पदार्थ खाल्ल्याने रक्तसंबंधित समस्या दूर होतात. 

शिंगाडा खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळत असल्याने उपवासात शिंगाडे किंवा याचे पीठ खाल्ले जाते.

मूळव्याधीचा त्रास असलेल्यांनी शिंगाडा खाणे उपकारक आहे.

दम्याचे रुग्ण आणि मधुमेही रुग्णही याचे सेवन करू शकतात. त्यांना यामुळे गुणकारी फायदे मिळतात.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*