पृथ्वीराज चव्हाणांना शिवसेनेचा प्रेमळ सल्ला

मुंबई :

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातत्याने सरकारविरोधात बोलत आहेत असे लोकांना वाटत असताना पृथ्वीराज चव्हाण यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात ते एका कार्यकर्त्यासोबत बोलत असताना ‘राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार आहे’, असे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री व शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते एकनाथ शिंदे यांनी ‘महाविकास आघाडीत पृथ्वीराज चव्हाण हे एक प्रमुख नेते असून त्यांनी आवश्यक असेल तेव्हा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधावा’, असा प्रेमळ सल्ला त्यांनी पृथ्वीराज बाबांना दिला आहे.

पुढे ते चव्हाण यांच्याप्रती आदर व्यक्त करत म्हणाले की,  राज्यात मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असले तरी हे महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार एकदिलाने काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी नियमितपणे संवाद होत असतो. त्यात पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असून ते मुख्यमंत्र्यांशी कधीही बोलू शकतात, काही अडचण असेल तर ती मांडू शकतात.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*