अळूची भाजी / वड्या खाण्याचे ‘हे’ आहेत ६ हेल्दी फायदे..!

ग्रामीण भागात अंघोळीच्या पाण्यावर उगवणारी अळूची पाने शहरी भागात खूप मागणी असलेली भाजी आहे. मात्र, तरीही यामुळे काहींना खाज येत असल्याने ही चविष्ठ पानांची भाजी आणि वड्या खाणे आवडत नाहीत. अशा मंडळींसाठी आम्ही सांगत आहोत अळूच्या पानाचे हे सहा गुणकारी फायदे.

१. अळूच्या पानामध्ये अ आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. हे खाल्ल्याने त्वचा सतेज होते आणि जखम भरून येण्यासह हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

२. वाढत्या वयाबरोबर हाडांची मजबुतीही कमी होत जाते. हे टाळण्यासाठी अळूचा वापर आपल्या आहारात असावा. यामध्ये कॅल्शियम हा घटकही असतो.

३. डोळ्यातील शुष्कपणा कमी होण्यासह डोळे सतेज होण्यासाठीही यामुळे मदत होते.

४. अ‍ॅनिमियाचा त्रास असल्यास अळूचे पदार्थ आहारात ठेवावे. यामुळे शरीरातील लोह (आयर्न) शोषण्याची क्षमता वाढते.

५. ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडीकल्सचा त्रास शरीरात असल्यास हे खाल्ल्याने असे त्रास कमी होतात.

६. पानांमध्ये फायबर घटक अधिक आणि कॅलरीज अत्यल्प प्रमाणात असतात. तसेच फायबर जास्त असल्याने वजन घटविणे आणि मधुमेही रुग्णांसाठी हे खूप उपकारक असते.

ता.क. : अळूची भाजी किंवा वडी चांगली शिजवून खावी. तसेच ज्यांना याची अ‍ॅलर्जी असल्यास आणि युरिक अ‍ॅसिड जास्त असलेल्या व्यक्तींनी अळूची पाने खाणे टाळावे किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन खावे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*