सुप्रीम कोर्टाने केंद्रासह राज्य सरकारांना फटकारले; मजुरांच्या मुद्द्यांवर मागविला खुलासा

दिल्ली :

करोनाच्या आपत्कालीन संकटामध्ये गरिबांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. मतदार म्हणून सर्व राजकीय पक्षांना आपलेसे वाटणारे हे गरीब म्हणजे ओझे असल्यागत सगळ्यांनी त्यांना वागणूक दिली आहे. त्यामुळे गरीब कष्टकरी मजुरांचे खूप हाल झालेले आहेत. त्याच मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्य सरकारांना नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे.

आपलेच सरकार कसे बेस्ट याची टिमकी वाजविण्यात सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते सोशल मिडीयावर भांडत आहेत. मात्र, त्याचवेळी कष्टकरी गरिबांना कोणीही वाली नसल्याचे विदारक चित्र या देशाने पहिले आहे. त्यावर माध्यमांनी मांडलेल्या वृत्तांकनाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व उपाययोजना खूप कमी असल्याचे म्हणत खुलासा मागितला आहे.

जस्टिस अशोक भूषण, जस्टिस संजय किशन कौल आणि जस्टिस एमआर शाह यांच्या पीठाने दोन पानांच्या ऑर्डरमध्ये म्हटले आहे की, माध्यमांनी केलेल्या वार्तांकनातील मजुरांची दयनीय अवस्था सर्वांनी पाहिली आहे. पायी किंवा सायकलवर अनेकांना मोठ्या पल्ल्याचा प्रवास करावा लागला आहे. त्यावर केलेल्या उपाययोजना सांगण्यासाठी कोर्टाने नोटीस पाठवली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*