एकाच न्यूज चॅनेलच्या ३६ कर्मचाऱ्यांना करोना; संपूर्ण बिल्डींग केली सील

दिल्ली :

पोलीस आणि पत्रकारांमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्याने अगोदरच चिंता वाढलेली असताना आता एकाच न्यूज चॅनेलच्या ३६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नॉयडा येथील सेक्टर १६ ए मधील एका इमारतीत चालू असलेल्या चॅनेलच्या ३६ कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती सुनील दोहरे या अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत अधिकृत माहिती हाती आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्याचवेळी या चॅनेलमध्ये एकत्रित काम करणाऱ्या सर्वांनाच कोविड १९ झालेला नाही.

५१ लोकांच्या चाचण्या केल्यावर त्यापैकी २८ जणांना करोनाची लागण झालेली आढळली आहे. तत्पूर्वी याच चॅनेलच्या आठ जणांना करोनाची लग्न झाल्याचे आढळले होते. बिल्डींगच्या चौथ्या आणि दुसऱ्या मजल्यावर रुग्ण सापडल्याने संपूर्ण इमारत सील केली आहे. तसेच इतरांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याच्या किंवा पुढील तपासणीच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*