राज्यात आज २०९१ करोनाचे नवीन रुग्ण

मुंबई :

आज दिवसभरात महाराष्ट्रात एकूण २०९१ करोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता एकूण करोनाबाधीत रुग्णांची संख्या ५४७५८ झाली असल्याचे माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज दिवसभरात करोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण जरी वाढले असले तरीही करोनापासून मुक्ती मिळवणार्‍या रुग्णांची संख्याही अकराशेपेक्षा अधिक आहे. जवळपास एका दिवसात ११६८ करोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहेत. 

पुढे त्यांनी सांगितले की, आज राज्यातील १६९५४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात अजूनही एकूण ३६००४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यंत्रणा विविध प्रकारे सर्वस्वी प्रयत्न करत आहेत. नुकतीच एका रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी सुध्दा यशस्वी झाली आहे.  

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*