वूहानची ‘ती’ संशोधक म्हणते, ‘करोना तर झाकी है..’; विषाणूंचे आगार आहेत वटवाघुळे

जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यासाठीचे केंद्र म्हणून चीन देशातील वूहान प्रसिद्ध झालेले आहे. तसेच आरोप-प्रत्यारोप यामुळे येथील वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी ही प्रयोगशाळा विशेष चर्चेत आहे. तेथील संशोधक आणि ‘बैट वूमैन’ म्हणून वटवाघुळे प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या शी झेंगली यांनी यावर खुलासा केला आहे.

त्यांनी चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले आहे की, वटवाघुळे ही विविध विषाणूचे आगार आहेत. जगभरातील वटवाघुळे या प्राण्यांवर संशोधन करताना आम्हाला धक्कादायक माहिती हाती आलेली आहे. करोना हा विषाणू काही एखाद्या प्रयोगशाळेतून पसरलेला नाही. प्रण्यामधून हा विषाणू आला आणि जगभरात पोहोचला आहे.

भविष्यात करोनापेक्षाही घटक विषाणू वटवाघुळे किंवा इतर जंगली प्राण्यांद्वारा मानवामध्ये पसरू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*