आता ‘यांनी’ सुध्दा घेतली राज्यपालांची भेट

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, भाजप खासदार नारायण राणे, आणि ईतर भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची वेगवेगळ्या विषयांसाठी भेट घेतल्यावर आता भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यांनी ‘राज्यातील परिस्थिती गंभीर आहे तसेच राज्यसरकार उपाययोजना करत नसल्याबाबत’चे निवेदन राज्यपालांना दिले आहे.

खासदार निंबाळकर हे केंद्राच्या गृह खात्याच्या समितीवर आहेत. राज्यात एका बाजूला जीवघेणे संकट उभे असताना दुसऱ्या बाजूला राजकीय घडामोडी नाट्यमय पध्दतीने घडत आहेत. अगदी सरकार पडणार अशा वावड्या उठत आहेत.

काल दिवसभर उद्धव ठाकरे आजारी आहेत, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असे अनेक फॉरवर्ड व्हाटसपला फिरत होते. दरम्यान भाजप खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी विनंती राज्यपालांना केली होती. तसेच आज कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी ‘महाराष्ट्रात आम्ही सत्तेत असलो तरी निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही’ असे विधान केले होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*