‘क्लोरोक्वीन’च्या क्लीनिकल ट्रायल बंद; WHO चा निर्णय

दिल्ली :

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारताला धमकी देण्याची आगळीक केलेल्या हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine Trial) गोळ्यांच्या क्लीनिकल ट्रायल बंद करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने घेतला आहे. चीनच्या दबावाने हा निर्णय घेतल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

अमेरिकेच्या ६ हजार करोना रुग्णांच्या पाहणीतून झालेले संशोधन प्रसिद्ध सायन्स जर्नल ‘लैंसेट’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यात हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनची गोळी घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर जास्त असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार हा निर्णय घेतला असल्याचे समजते. मात्र, तरीही चीनवर संशयाची सुई जात असल्याने यानिमित्ताने भारत विरुद्ध चीनच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*