महाराष्ट्रातील तरुणांच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई :

‘उत्तर भारतीय मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर वेळ लागेल’, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर ‘फडणवीस यांचं विधान म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचा प्रयत्न आहे’ असा आरोप जयंत पाटील यांनी लावला होता. यावर स्पष्टीकरण देत फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांच्या जागी स्थान मिळाल्यास मला आनंदच, मी त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यासाठी तरुणांना ते कौशल्यही द्यावं लागेल. डायमंड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगालचा कामगार काम करतो. तो जर निघून गेला तर महाराष्ट्रातील कुठल्या कामगाराला ते कौशल्य लगेच आत्मसात करता येणार आहे. ते कौशल्य त्याला आधी शिकावं लागेल.

यावेळी ते फेसबुक लाईव्हवर संवाद साधला. पुढे त्यांनी राज्य सरकारवर खोटे बोलत आहे असा आरोप करत म्हटले की, केंद्राकडून काही येत नाही अस सांगायचं, कधी सांगायचं केंद्राकडे आमचे १८ हजार कोटी, कधी सांगायचं १६ हजार कोटी, असे आभासी आकडे राज्य सरकार सांगत आहे. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रयत्न त्यांनी केला आहे. यावेळी गहू आणि तांदूळचा विषय, रेल्वेचा खर्च, महाराष्ट्राच्या अंतर्गत मजुरांचा प्रश्न तसेच कापूस खरेदी संदर्भात त्यांनी माहिती दिली. 

  

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*