जे मागितले ते मोदींनी दिलेच नाही; महाराष्ट्राला दुजाभाव, पोमाने यांनी शेअर केली लिस्ट..!

मुंबई :

महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत जे काही यंत्र आणि उपकरण मागितले. त्यापैकी महत्वाची आणि बहुसंख्य वस्तूंची मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचा आरोप करून ज्ञानेश्वर पोमाने यांनी एक लिस्ट शेअर केली आहे. त्यांचा हा दावा सोशल मीडियामध्ये शेअर होत आहे.

पोमाने यांचे हे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली शहर आणि ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी रिट्विट केले आहे. पत्रकार रश्मी पुराणिक यांनीही हीच लिस्ट शेअर केली आहे. पोमाने यांनी यात म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारचा महाराष्ट्र द्वेष बघा. एन-95 मास्क मागितले 49 लाख 13 हजार 500 मिळाले 13 लाख 13 हजार 300, पीपीई किट मागितले 17 लाख 93 हजार मिळाले शून्य, ग्लोव्हज मागितले 25 लाख 24 हजार 500 मिळाले 28 हजार, व्हेंटिलेटर मागितले 4 हजार 221 मिळाले शून्य. तरीही केंद्राची वकिली करतात साले..’

ही लिस्ट आणि आकडेवारी सध्या सोशल मिडीयावर जोरात शेअर होत आहे. यावर महाराष्ट्र भाजप किंवा महाराष्ट्रातील एकही भाजप नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा हा दावा खोडून काढलेला नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*