पुण्याचे येनपुरे म्हणतायेत, ‘टोपेजी, धंदा है पर गंदा है’; पहा काय आहे निमित्त

पुणे :

महाराष्ट्रातील सर्व करोनाबाधित रुग्णांचा सर्व खर्च शासन करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याचा शेकडो वेळा पुनरुच्चार केला आहे. तरीही खासगी रुग्णालये लाखोंचा खर्च घेत असल्याकडे पुण्याचे नगरसेवक राजेश येनपुरे यांनी लक्ष वेधले आहे.

त्यांनी पुण्यातील एका पाटीवर म्हटले आहे की, आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब, आपण बोलला होतात, महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा सर्व खर्च शासन करणार म्हणून.. पण करोनावर लस नसताना २८०० रुपयांचा खर्च असलेल्या औषधांसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमधून ४-५ लाख रुपये बिल लावलेच कसे जाते..? धंदा है पर गंदा है..!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पियुष कश्यप यांना फॉलो करतात त्यांनी यावर हा फोटो ट्विटरवर टाकत म्हटले आहे की,

पुण्यातील नगरसेवक राजेश येनपुरे यांनी लिहलेला फलक !! अतिशय मोजक्या आणि सोप्या शब्दांत महाविकास आघाडीच्या खोट्या घोषणांची चिरफाड त्यांनी केली. @rajeshtope11 जी तुमच्याकडून अपेक्षा नाही पण जमल्यास उत्तर द्यावे..

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*