होय, व्हिएतनाममध्ये सापडले ११०० वर्षे जुने शिवलिंग..!

दिल्ली :

भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा थेट बाहेरच्या देशात आणि समुद्रापार भेटण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र, आता व्हिएतनाम देशात तेथील चाम मंदिराच्या भागात सुमारे ११०० वर्षे जुने शिवलिंग सापडले आहे.

याबाबतचे ट्विट भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले आहे. त्यांनी ऑर्गनायझरची एक लिंक देऊन म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व खात्याने हे महत्वाचे संशोधन केले आहे. भारतीय सिव्हील सोसायटीच्या पाऊलखुणा जगभरात सापडत आहेत.

ऑर्गनायझरने आपल्या बातमीत म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही याबाबतीत माहिती देणारे ट्विट केले आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज यादीत व्हिएतनामी प्रदेशातील हे चाम मंदिर आहे. तेथील उत्खननात हे शिवलिंग सापडले आहे. यावर भारतातील चार संशोधक आणखी उत्खनन करीत आहेत.

https://www.organiser.org/Encyc/2020/5/27/Cham-temple-complex.html

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*