औरंगाबादेत करोनाचे एकाच दिवशी सहा बळी

औरंगाबाद :

औरंगाबादमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस करोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. काल औरंगाबादेत करोनाने ६ बळी घेतले. या मृत्यू झालेल्या सर्वांचे वय हे ४० ते ७५ दरम्यान होते. आता औरंगाबादमधील करोनाबाधीतांचा आकडा १ हजार ३६२ वर जाऊन पोहोचला आहे. तर आतपर्यंत ६५ मृत्यू करोनामुळे झाले आहेत.  

या मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मकसूद कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक, इंदिरानगर बायजीपुरा येथील ५६ वर्षीय पुरुष, हुसेन कॉलनीतील ३८ वर्षीय पुरुष, माणिकनगर गारखेडा परिसरातील ७६ वर्षीय महिला, रोशनगेट भागातील ६४ वर्षीय पुरुष, रहिमनगरातील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

मुंबई, पुणे या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच होती. तसेच शहरात दररोज किमान एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तेथील तणाव वाढला होता.

सुरुवातीला राज्यभर कोरोनाचे रुग्ण सापडत होते, परंतु औरंगाबाद मध्ये मात्र एकही रुग्ण सापडत नव्हता. त्यामुळे औरंगाबादकर निर्धास्त होते. अचानक एकाच दिवशी सतरा रुग्ण सापडले आणि तिथून जो कोरोनाने औरंगाबाद जिल्ह्यात शिरकाव केला तो अजूनही लोकांना बाधित करतच आहे. शहरातील विशिष्ट भागात उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचा विळखा हळूहळू सर्व शहराला बसत आहे. या महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरा दिवसात औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधीतांची वाढ झपाट्याने झाली होती. जवळपास ८०० पेक्षा अधिक रुग्ण पंधरा दिवसात वाढले आहेत. जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ९००पेक्षा अधिक आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*