खोट्या नोटांची बाजारात चलती; ‘अशा’ ओळखा खऱ्या-खोट्या नोटा

पुणे : 

पुण्यात तब्बल ४३ कोटी रुपयांच्या बनावट नोटा नुकत्याच पकडल्या गेल्या आहेत. भारतात बनावट नोटांचा उद्योग तसेच वापर अजूनही अजूनही चालू आहे. या छाप्यामध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या नोटा पकडण्यात आलेल्या आहेत.  

अशा बनावट नोटा कदाचित आताही तुमच्याकडे असू शकतात. कारण नोटा बदल करूनही सरकारला खोट्या नोटांचा गोरख धंदा रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आता तुम्हीच 2000 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा ओळखण्यास शिकले पाहिजे.

अशा ओळख बनावट नोटा :-

 • सिक्युरिटी थ्रेड आहे, यावर भारत, आरबीआय आणि 2000 लिहिले आहे. नोट थोडी दुमडल्यानंतर या थ्रेडचा कलर हिरव्यातून निळा होतो.
 • गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सिग्नेचर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा दोन्ही बाजूला लोगो डावीकडे आहे.
 • उजवीकडे आणि डावीकडे सात ब्लीड लाईन्स आहेत. ज्या खडबडीत आहेत.
 • येथे महात्मा गांधींचे छायाचित्र आणि इलेक्ट्रोटाईप (2000) वॉटरमार्क आहे.
 • वर सर्वात डाव्याबाजूला वर आणि खाली सर्वात उजव्या बाजूला लिहिलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.
 • नोट प्रकाशासामोर धरल्यानंतर 2000 लिहिलेले दिसते.
 • येथे लिहिलेला नंबर 2000 चा रंग बदलतो. याचा रंग हिरव्यातून निळा होतो.
 • डोळ्यांसमोर 45 डिग्री एँगलवर ठेवल्यास 2000 लिहिलेले दिसते.
 • देवनागरीमध्ये 2000 लिहिलेले दिसते.
 • उजवीकडे आयताकार बॉक्स, ज्यामध्ये 2000 लिहिले आहे.
 • मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र आहे.
 • छोट्या-छोट्या अक्षरात आरबीआय आणि 2000 लिहिलेले आहे.
 • उजवीकडे अशोक स्तंभ आहे.
 • नोटेचा मुख्य कलर मॅजेंटा आणि तिचा आकार 66 मिमी बाय 166 मिमी
 • नोटेच्या दर्शनी भागात महात्मा गांधी आणि मागच्या बाजूला मंगळयानाचे छायाचित्र

 ५०० नोट ओळखण्यासाठी याच गोष्टी आहेत. फक्त आकार आणि रंगामध्ये बदल आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*