त्यामुळे सोन्याच्या किंमतीत झाली आहे घसरण

मुंबई : 

अमेरिकी डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याच्या किंमती गुरुवारी ०.५२ टक्क्यांनी कमी होऊन १७३६.२ डॉलर प्रति औसांवर पोहोचल्या. परिणामी इतर चलनधारकांसाठी पिवळ्या धातूची किंमत वाढली. हिवाळ्याच्या महिन्यात साथीच्या आजाराच्या भयंकर लाटेची चिंता अधिक असल्याने सोन्याच्या किंमती आणखी घसरण्यावर मर्यादा आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

चांदीच्या किंमती ३ टक्क्यांनी घटून १७.७ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमती १.१५ टक्क्यांनी वाढून ४८,६३९ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.

मागणी घटल्याने कच्च्या तेलाच्या किंमती ८.२ टक्क्यांनी घसरून ३६.३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या तसेच अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरीच्या पातळतही वाढ झालेली दिसून आली. अमेरिकेने सौदी अरेबियाच्या इन्व्हेंटरीतील आयात मागीत आठवड्यात वाढवल्याने अमेरिकी कच्च्या तेलाचा साठा ५.७ दशलक्ष बॅरलने वाढला. जगभरात कोरोनाच्या केसेस कमी झाल्याचे वृत्त आल्यानंतर चीन आणि काही ठिकाणी नव्याने कोरोना व्हायरसच्या केसेस आढळल्या. यामुळे मागणीत घट आणि किंमतींवरही परिणाम झाला.

लंडन मेटल एक्सचेंजवरील बेस मेटलचे दर नकारात्मक स्थितीत दिसून आले. यू.एस. फेडरल रिझर्व्हद्वारे प्रकाशित कमकुवत आर्थिक डाटाचेही वृत्त होते. यामुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला आणि किंमती घसरल्या.रुग्णांची संख्या २० लाखांपुढे गेल्याने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यस्थेची वाताहत झालेली दिसत आहे. प्रमुख आर्थिक परिसरात हिंसक आंदोलन पसरले असून याचा परिणाम किंमती आणि व्यापार घटण्यावर झाला.

तथापि, अमेरिकेने जाहीर केलेल्या व्यापक आणि प्रेरणादायी उपाययोजनांच्या आशेमुळे तसेच चीनमध्ये पायाभूत सुविधांवरील खर्च वाढल्याने तसेच सकारात्मक व्यापारी अहवालांमुळे किंमतींच्या घसरणीला मर्यादा आल्या.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*