काल राज्यात नवीन 3307 करोनाबाधीत

मुंबई :

काल दिवसभरात महाराष्ट्रात एकूण 3307 करोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता एकूण करोनाबाधीत रुग्णांची संख्या 116752 झाली असल्याचे माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. गेल्या 20 दिवसांपासून राज्यात रोज 2000 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. 

काल दिवसभरात करोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण जरी वाढले असले तरीही करोनापासून मुक्ती मिळवणार्‍या रुग्णांची संख्याही तेराशेपेक्षा अधिक आहे. जवळपास एका दिवसात 1315 करोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहेत. 

पुढे त्यांनी सांगितले की, आजपर्यंत एकूण 59166 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात अजूनही एकूण 51921 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनाचा हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यंत्रणा विविध प्रकारे सर्वस्वी प्रयत्न करत आहेत. नुकतीच एका रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी सुध्दा यशस्वी झाली आहे. तसेच करोनावर उपायकारक असणाऱ्या Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन महाराष्ट्र सरकार खरेदी करत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*