हे जोक्स वाचा, पोटभर हसा

 • ससा नेहमी धावतो, पळतो तरतरीत राहतो,
  त्याचे आयुष्य असते 15 वर्षे…

  तेच कासव ना धावपळ करते,
  ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे …..

  यावरून धडा घ्या कामधंदे सोडा,आराम करा…अन whatsapp वापरा
 • केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
  डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर

  डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
 •  आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून
  आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.

  अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.
 •  कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग
  ……स्वाईन फ्लू चे 8 बळी…….
  लगेच बायकोने मला हाक मारली …..अहो ऐकलंत का……..?

  हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे…….?

  त्याने म्हणे 8 बळी घेतले नवरा तिथेच कोमात गेला…
 • प्रिय पुणेकरांनो,
  एक गोष्ट लक्षात घ्या…लाल सिग्नल ला
  गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर….

  प्रिय मुंबईकरानो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.
  Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर
 • एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,

  तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते.
  आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर….

  सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय…

  आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत..

  सूनबाई थेट दवाखान्यात
 • बरं झालं बोर्डच्या रिझल्ट मध्ये Exit poll नाही ते

  नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती….
 • सर्वात कमी शब्दांचा पण अतिशय (हास्य)स्फोटक विनोद…

  .
  .
  सासरे (फोनवर): काय जावईबापू… काय करताय?

  जावई: सहन
 • प्रियकर: प्रिये तुझी आठवण
  आली,की तुझा फोटो समोर घेऊन
  तुला बघत राहतो.
  .
  .
  .
  प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
  आली तर काय करतोस ?
  .
  .
  .
  .
  प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*