गणेश मूर्तींच्या उंचीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई :

करोनासारख्या महामारीने अनेक ऐतिहासिक परंपरा, गोष्टी थांबवल्या. अगदी आजवर कधीही न थांबलेली रेल्वेही थांबवली. याच करोनाचे सावट आता यंदाच्या गणेशोत्सवावर पडण्याचे चिन्ह असताना मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ‘श्री गणेशाच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुठेही गर्दी करू नये’, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

यापूर्वीही गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबत गणेश मंडळांशी चर्चा करत असताना त्यांनी “यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा”, असं आवाहन केलं होतं.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले की, मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक मंडळांना केलं आहे. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*