‘शहीदों को सलाम’ राहिला बाजूला; ‘या’ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच सुरू झाली हाणामारीची ‘लढाई’..!

दिल्ली :

राजकीय मंडळी कशाचे राजकारण कोणत्या गोष्टीशी खातील याचा काहीच नेम नाही. आताही लडाख भागातील गलवान घाटी भागातील शहिदांच्या मुद्यांवर सर्व राजकीय पक्षांनी आपापली राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. अशाच एका प्रकारात ‘शहीदों को सलाम’ राहिला बाजूला आणि फोटो काढण्यावरून दोन कार्यकत्यांमध्येच लढाई झाली.

राजस्थानमधील अजमेर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी काँग्रेस पार्टीने देशभरात ‘शहीदों को सलाम दिवस’ साजरा केला. असाच कार्यक्रम अजमेर येथे सुरू असताना ही घटना घडली. पक्षाने दोन्ही कार्यकर्त्यांवर याप्रकरणी कारवाई केली आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने याची बातमी दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याचा व्हिडिओ ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.

चीनला विरोध करणे राहिले बाजूला आपल्याच शहिदांच्या कार्यक्रमात आपसात भांडून या कार्यकर्त्यांनी उलट शहिदांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया सोशल मिडीयावर अनेकांनी व्यक्त केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*