असे बनवा घरच्या घरी ड्राय फ्रुट श्रीखंड; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

श्रीखंड हे आपण नेहमी नेहमी स्वीट होममधून मागवतो किंवा डेअरीमधून घेतो. पण एकदा हा गोड आणि चवदार पदार्थ आपल्या घरात करून पहा, पुन्हा कधीच बाहेरून आणायची इच्छा होणार नाही. आज आम्ही आपल्याला ‘ड्रायफुट श्रीखंड’ विषयी सांगणार आहोत. जे बनवायला एकदम सोपे आहे. आणि ‘टेस्ट मे बेस्ट’ आहे.

तर साहित्य घ्या मंडळीहो…

 • 1 लिटर दही
 • 1 कप पिठी साखर किंवा आवश्यकते नुसार
 • 1 टीस्पून वेलची पावडर
 • काजू, बदाम, पिस्त्याचे काप आवश्यकते नुसार

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय… लागा की बनवायला

 1. सर्वात आधी एका पातळ सुती कापडात दही घट्ट बांधून रात्रभर टांगवुन ठेवावे.
 2. त्याखाली एक भांड ठेवावं म्हणजे पाणी त्यात पडेल.
 3. आता चक्का तयार झल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यावे.
 4. नंतर पिठी साखर, वेलची पूड घालावी.
 5. मग त्यात काजू, बदामचे काप घालून छान एकजीव करून घ्यावं.
 6. फ्रीज मध्ये थंड करण्यासाठी ठेवावे.
 7. आपलं ड्राय फ्रुट श्रीखंड तयार आहे.
 8. हे श्रीखंड काजू, बदाम, पिस्ताने सजवावे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*