खुशखबर, 1TB पेनड्राइव OTG येत आहे; ४ जुलैपासून होणार विक्री सुरू

टेक्नोलॉजीच्या जगात आणखी एक महत्वाचे प्रोडक्ट ४ जुलैपासून दाखल होत आहे. होय, आपल्या मोबाइलमधील डाटा सेव्ह करून ठेवण्याचे मोठे आव्हान असलेल्या तंत्रस्नेही मंडळींसाठी थेट 1TB पेनड्राइव OTG उपलब्ध होणार आहे.

वेस्टर्न डिजिटल यांच्या सैंडिस्क (SanDisk) कंपनीने 32GB, 64GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज क्षमतेचे पेनड्राइव ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. 150Mbps इतकी रीड स्पीड क्षमता याला असणार आहे. मोबाइलसह संगणक व स्मार्ट टीव्ही यांनाही हा जोडता येणार आहे. याची सध्याची किंमत 13,529 असणार आहे. ऐमजॉनवर याची विक्री केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*