टिकटॉक, शेअरईटसह ईतर 59 चिनी अॅप्सवर भारताने घातली बंदी

मुंबई :

केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने तब्बल 59 चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

यात अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान मालवेअर आणि शंकास्पद अॅप्सची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही अॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*