गुड न्यूज! ‘या’ जिल्ह्यात प्लाझ्मा प्रक्रिया यशस्वी; ‘एवढे’ करोनारुग्ण झाले बरे

कोल्हापूर :

प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई सहभागी झाले होते. यावेळी  प्लाझ्मा थेरपी करोनाच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावत असून कोल्हापूर येथे रूग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, सीपीआर रूग्णालयामध्ये आठ करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे. यातील पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित तिघांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले की, आता करोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*