आज पेट्रोल कंपन्यांनी भाववाढीबाबत घेतला ‘हा’ निर्णय

दिल्ली :

गेल्या २१ दिवस तेल कंपन्या सातत्याने कच्च्या तेलाची किंमत कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवतच होत्या. गेल्या २ महिन्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला होता. जागतिक बाजाराशी सुसंगत असूनही देशात पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीला आज पुन्हा एकदा ब्रेक लागला. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. याआधी गेल्या रविवारी कंपन्यांनी इंधन दरात कुठलाही बदल केला नव्हता.

तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तेल कंपन्या स्वतःच्या कराचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती दोन दशकांमध्ये सर्वात कमी असतानाच सरकारने ६ मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोलवर प्रति लीटर १० रुपये तर डिझेलवर प्रति लीटर १३ रुपये कर आकारण्यास सुरुवात केली. मागील २३ पैकी २२ दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. या दरवाढीने दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या तुलनेत डिझेल महाग झाले. डिझेलचा भाव ८० रुपयांवर गेला. तर मुंबईत पेट्रोल ९० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*