हे जोक्स वाचा, पोटभर हसा…

 1. सध्या काहीच काम धंदा नाही आहे
  म्हणून
  सर्व मित्रांच्या लग्नाच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या
  तारखा लिहून घेत होतो..

मग मी पहिल्या मित्राला कॉल केला आणि विचारले
तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो रे ?
तर तो बोलला… एकच मिनिट थांब हा.

भांडीच घासतोय.

“तांब्यावर बघुन सांगतो.”

 • पक्का पुणेरी

काल कोरोना टेस्ट करायला गेलो. डॉक्टर म्हणाले ₹ ४५००, होतील…

मी डॉक्टरांच्या जवळ जाऊन तोंडाजवळ शिंकलो आणि निघून आलो.

आता डॉक्टर स्वतःची टेस्ट करतील,
डॉक्टर निगेटिव तर् मी पण निगेटिव.

 • आज कार घेऊन घरातून बाहेर पडताना

गुगल मँप ऑन केले…

            तसा आवाज आला…

फटके हवे असल्यास*
पन्नास मिटरवर उजवीकडे वळा.*

उठाबशा काढायच्या असतील*
तर डावीकडे वळा..*

हे दोन्हीही नको असल्यास

यु टर्न घेऊन..

चुपचाप

घराकडे वळा.

 • ऑनलाइन क्लास संपल्यावर

मॅडम: काही प्रश्न असतील तर विचारा

मुलगा: पाठीमाघे दिसत होती ती, ब्लॅक टॉप वाली तुमचीच मुलगी आहे का ?

 • दुकानदार: आज माझा बदला पुर्ण झाला.

गिर्हाईक: कसा काय?

दुकानदार: आज SBI चा मँनेजर किराणा घ्यायला आला होता, मी सांगितले लंचटाईम आहे नंतर या…

 • मी : अग कोठे आहेस?

सौ. : तुमच्या हृदयात        

मी : किती वेळा सांगितले गर्दीच्या ठिकाणी जाऊ नकोस म्हणून

 • अल्पना देवळात गेली होती …

अल्पना :- गुरूजी, करोना ची खूप भीती वाटतेय 🥶

गुरुजी :- भिऊ नकोस, हात पुढे कर आणि हे घे😇

अल्पनाने भक्तिभावाने प्राशन केले …🙏

अल्पना:- गुरूजी तीर्थ थोडं कडू होतं…

गुरुजी:- प्यायलीस कि काय ? अगं बाई, सॅनीटायझर होतं ते

 • एका देशी बारमध्ये एक गुरुजी शिरतात__
  पहिल्याच बेवडया मित्राला पकडतात आणि म्हणतात,
  “दारू पिणे वाईट असते…. सोड पाहू!”
  बेवडा मित्र : “जोशी गुरुजी तुम्ही कधी घेतली आहे का ?”
  गुरुजी : “नाही कधीच नाही !”
  बेवडा : “एकदा घेऊन पहा, नाही आवडली तर मी पिणे सोडीन !!”
  गुरुजी : “ओ के ! पण चहाच्या कपातून द्यायला सांग ! उगाच लोकांनी मला पिताना पाहायला नको !”
  बेवडा जातो गुत्याच्या मालकाकडे आणि कपात दारू मागतो.
  मालक : अरेच्या जोशी गुरुजी आले वाटतं !
 • मास्तर:- बंटी ज़र वाघ तुह्या मागं लागला तर तु काय करशीन??

बंटी :- मी झाडाच्या मागं लपिन …

मास्तर :- वाघानं तुले पाह्यलं तर

बंटी :- मी झाडावर चढून जाईन

मास्तर :- वाघ पण झाडवर चढला तर ??

बंटी:- मी नदीत उडी मारन

मास्तर:- आणि वाघानं नदीत
उडी मारली तर??

बंटी:- मास्तर …. म्हणजे वाघ मले
खाईन तवाच तुम्हचं समाधान होईल का??

 1. लग्नात बुटाच्या ऐवजी नवरदेवाचा मोबाईल लपवला तर ???

तर नवरदेव ₹ 500/- च्या जागी ₹ 50,000/- पण द्यायला तय्यार होईल. .

थोडेसे विचार बदला… एकटे मोदी काय काय बदलतील  

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*