ब्रेकिंग : ‘त्या’ दहशतवाद्यांनी दिली ताज हॉटेलवर हल्ला करण्याची धमकी

मुंबई :

नुकतेच पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवाद्यांनी थेट हल्ला केला होता . भारतासह शेजारील सर्व देशांना पाण्यात पाहून त्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया घडविण्याचे पाकिस्तानचे लक्ष्य असते. तेथील कुडमुडे सरकार, लष्कर आणि गुप्तचर संस्था यांचा हाच उद्योग त्यांच्याही अनेकदा अंगलट आलेला आहे. आता त्याच दहशतवाद्यांनी जगप्रसिद्ध ताज हॉटेलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

पाकिस्तानमधून आलेल्या एका निनावी फोनमधून ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करून बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी दिली आहे. काल मध्यरात्री ताज हॉटेलच्या व्यवस्थपकांना एका निनावी फोन आला होता. या फोनमधून ताजवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली.

सदर फोन हा पाकिस्तानमधून आल्याचं सांगण्यात आलं आहे. या धमकीनंतर ताज हॉटेलच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*