सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे चीनविरोधात भारतही झाला सज्ज; ‘अशी’ केली तयारी

दिल्ली :

लडाखच्या गलवान घाटी भागातील रेटारेटीमध्ये हिंसक घटना घडल्याने भारताचे किमान २० जवान शहीद झाले होते. याच पार्श्वभूमीवर नंतर चीनी आणि भारतीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. भारताने चीनला सर्व बांधकाम थांबविण्याचे तसेच सैन्य मागे घेण्याचे आदेश दिले असतानाही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे किमान १६ कॅम्प एलएसीच्या ९ किलोमीटर अंतरावर उभारले आहेत. तसेच Pangong Tso भागात चीनने हेलिपॅडची उभारणी केली आहे. उपग्रह छायाचित्रांवरून हे स्पष्ट झाले आहे की, चीनने भारताच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भारत-चीन सीमावाद आता थेट युद्धाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारत सज्ज झाला आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० रणगाडे तैनात केले आहेत. हे रणगाडे क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत. तसेच चीनने त्या भागातील सैन्य कमी न करता मोठ्या प्रमाणात सैन्य उभा केले आहे. एलएसीमध्ये भारतीय हद्दीत उपस्थित असलेल्या भारतीय लष्कराला हा थेट धोका आहे. हे लक्षात घेऊनच भारतीय सैन्याने इतक्या उंचावरील भागात टी-९० भीष्म रणगाडे तैनात करण्याचा निर्णय घेतला. 

भारतीय सैन्याने युद्ध वाहनांसह १५५ एमएम हॉवित्झर तोफाही तैनात केल्या आहेत. चीनच्या कुठल्याही आव्हानाला प्रयुत्तर देण्यासाठी चुशुल सेक्टरमध्ये दोन टँक रेजिमेंट तैनात केल्या आहेत. यापुढे चीनची कुठलीही दादागिरी खपवून घ्यायची नाही अशी भारताची भूमिका आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*