औरंगाबादनंतर ‘या’ शहरातही होऊ शकतो लॉकडाऊन; पहा का घेतला जातोय असा निर्णय

मुंबई :

औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै २०२० या कालावधीत पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. या शहरासह सोलापूर शहरातही असाच निर्णय घेतला जाऊ शकतो. पालकमंत्री दत्ता भरणे यांनी याबाबचा सूचक इशारा दिला आहे.

औरंगाबाद शहरात मंगळवारी १५० रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ६८८० एवढी झाली असून सध्या ३३७४ रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. अशावेळी प्रश्सानातील धुरिणांनी बैठकीत पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी पुणे, मुंबई आणि सोलापूर या शहरातही करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळेच या शहरांबाबत कोणता निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

सोलापूर शहरात अशा पद्धतीने टाळेबंदी जाहीर करण्याचा सूचक इशारा भरणे यांनी दिल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्स या अर्थपत्राने दिलेले आहे. या शहरात किमान १० दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय होऊ शकतो. मात्र, पुढील काही दिवसात जर परिस्थिती सुधारली आणि नागरिकांनी नियम पाळण्याचे सहकार्य केले तर इथे असा निर्णय घेतला जाणार नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*