मास्टरस्ट्रोक | TikTok घेणार चीनपासून सोडचिठ्ठी; भारताचा मोठा दणका

चीनमधून जगभरात जाळे विस्तारत असलेल्या चीनी कंपन्यांना भारताच्या बंदीने मोठा झटका बसला आहे. ५९ चीनी मोबाईल अॅप्लिकेशनवर बंदी घटल्याने मोठा झटका बसलेल्या चीनने आता चीनलाच सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे.

भारतानंतर आता अमेरिकेतही TikTok बंदी घालण्याची मागणी काहींनी केली आहे. मात्र, तेथील निर्णय घेणे ट्रम्प प्रशासनाला कितपत शक्य आहे हे चाचपले जात आहे. मात्र, चीनमधून बिजनेस ऑपरेट करीत असल्याचा फटका बसण्यास सुरुवात झाल्याने कंपनी प्रशासन हादरले आहे. आता या अॅप्लिकेशनची मालकी असलेल्या बाइटडांस कंपनीने चीनच्या बाहेर आपले मुख्य कार्यालय हलवण्याची तयारी केली आहे.

भारतात या अॅप्लिकेशनचे सुमारे २० लाख युझर आहेत. त्यामुळे कंपनीच्या नफ्यातील मोठा वाटा भारतातून येत होता. मात्र, तो बंद झाल्याने कंपनीची झाक उतरली आहे. त्यामुळे त्यांनी चीनमधून बाहेर पडण्याची तयारी केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*