करोना लससाठी ‘या’ भारतीयाने केले ३३०० कोटीचे दान; वाचा मानवतावादी उद्योजकाची ‘ही’ बातमी

करोनावरील लस संशोधनासाठी युरोपातील संशोधक दिवसरात्र एक करीत आहेत. अशावेळी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या जेनर इंस्टिट्यूटला मूळ भारतीय असलेले उद्योजक लक्ष्मी निवास मित्तल यांनी ३३०० कोटी रुपयांचे दान दिले आहे.

मानवतावादी दृष्टीकेनातून त्यांनी लस संशोधांसाठी ही मोठी मदत केली आहे. अर्सेलर-मित्तल नावाच्या जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे मालक असलेल्या या उद्योजकाने ही मदत केल्याची दखल अवघ्या जगणे घेतली आहे. ते इंग्लंडमधील लंडन येथे राहतात आणि जगभरात त्यांचा हा व्यवसाय विस्तारलेला आहे.

आतापर्यंत अनेकांनी लस संशोधनासाठी मदत केली आहे. मात्र. मित्तल यांची ही मदत मोठी असल्याने ती दखलपात्र बनली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*