TikTok सहित सर्व चीनी अॅपना केंद्राचा आणखी एक झटका; पहा काय केलेय मोदी सरकारने

दिल्ली :

TikTok सहित ५९ चीनी अॅपवर बंदी घातल्याने आता सर्वांच्या मोबाइलमधून हे अॅप्लिकेशन गायब झालेले आहेत. मात्र, त्यावरच न थांबता आता केंद्र सरकारने या सर्व अॅप्लिकेशन कंपन्यांना नोटीस पाठवून उत्तरे मागितली आहेत.

५९ अॅप्लिकेशनवर बंदी आल्याने चीनला मोठा आर्थिक फटका बसल्याचे म्हटले जात आहे. अशावेळी काही कंपन्यांनी चीनमधून आपली मुख्यालये हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता तीन महिन्यांची मुदत देऊन केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय (MEITY) यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.

माहिती चोरी करण्यासह इतरही काही प्रश्नांचा भडीमार त्याद्वारे करण्यात आलेला आहे. एकूण ७९ प्रश्न त्या नोटीसमध्ये आहेत. नियमानुसार कारवाई करण्यापूर्वी अशी नोटीस देणे आवश्यक आहे. मात्र, जर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे नाही मिळाली तर मात्र मग भारतात या सर्व अॅप्लिकेशनवर कायमची बंदी येईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*