‘तिने’ डॉक्‍टरांना पोसलय, माजलेत सगळे साले; ‘येथील’ महिला तहसीलदाराचे विधान

पुणे :

इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याशी अरेरावीची भाषा वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी संवाद साधताना थेट असभ्य भाषा वापरली आहे. ‘वालचंदनगर तालुका वैद्यकीय अधिकारी (टीएचओ) शहाणी नाही…तिला अक्कल नाही…तिने तालुक्‍यातील डॉक्‍टरांना पोसलय…माजलेत सगळे साले…. हे शब्द आहेत तहसीलदार सोनाली मेटकरी यांचे…

लासुर्णे गावामध्ये तहसीलदार सोनाली मेटकरी या वैद्यकीय अधिकारी डॉ.पूनम गुडले व आरोग्य विभागील कर्मचाऱ्यावर भडकल्या. इंदापूरचे पेशंट बारामतीला गेलेच का ? हा प्रश्न त्या सातत्याने विचारत होत्या. डॉ.पूनम गुडले यांना ‘तू माझ्या बापाची नोकरी करत नाही, तुला ऐकून घ्यावेच लागले. ऐकायची सवय ठेव.तालुका वैद्यकीय अधिकारी शहाणी नाही. तिला अक्कल नाही. तिने असल्या डॉक्‍टरांना पोसलय. माजलेत सगळे साले’, अशी अरेरावीची भाषा वापरल्याची धक्कादायक प्रकार लासुर्णेमध्ये घडला. डॉ.पुनम गुडले व कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्यअधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार यांची तक्रार केली आहे.

यासंदर्भात इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, डॉक्‍टरांना वरिष्ठांशी कसे बोलायचे हे माहिती नाही. मी अक्कल हा शब्द काढलेला नसल्याचा त्यांनी खुलासा केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*