सुवर्णसंधी; ‘या’ जिल्हा परिषदेअंतर्गत ३,८२४ पदांसाठी भरती

सोलापूर :

करोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. सध्या अनेक सरकारी जागा रिकाम्या होत असल्याने सरकारी नोकऱ्यांची भरती चालू आहे. अशातच  जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत विविध ३,८२४ पदांसाठी भरती निघाली आहे. अशा मंदीच्या काळात एवढ्या जागा म्हणजे एक सुवर्णसंधी आहे.

अशी आहेत पदे व संख्या :-

१) फिजिशियन (१०४)

२) भुलतज्ञ (७१)

३) वैद्यकीय अधिकारी (४५४)

४) आयुष वैद्यकीय अधिकारी(४४३)

५) स्टाफ नर्स (२६८३)

६) क्ष-किरण तंत्रज्ञ (६९)

पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा १३ जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. covidsolapur2020@gmail.com या मेल आयडीवर ऑनलाइन अर्ज करावा.

असा करा अर्ज :-

  • अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
  • आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*