भाजपमध्ये आहे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती; धारावीच्या मुद्यावर सेना खासदारांची टीका

मुंबई :

धारावी या सुप्रसिद्ध झोपडपट्टी भागातील करोना विषाणूचा फैलाव रोखण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळ्यांचा आटापिटा चालला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या भागातील कोविड १९ नियंत्रणाबाबत समाधानकारक अहवाल आल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामध्ये भाजपने हे सगळे यश RSS च्या नावावर खपवले आहे. त्यावरून दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

त्यांनी फेसबुक पेजवर म्हटले आहे की, “धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे *मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती आहे.* धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका आहे. राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, डॉक्टर्स, मुंबई पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि धारावीची जनता यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याच प्रयत्नांची दखल घेऊन प्रशंसा केली आहे.”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*