परीक्षेच्या मुद्यावर राऊत यांनी काढला राज्यपालांना चिमटा; पहा काय म्हणालेत ते

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या परिक्षावरून पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. एबीपी माझा वाहिनीलाला मुलाखत देताना त्यांनी दाखवून दिले की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जो परीक्षा झाल्या पाहिजेत असा घाट घातला होता तो कशा प्रकारे चुकीचा आहे. तसेच राज्यात आणि देशात संकट असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे.

एबीपी माझाला मुलाखत देताना शिवसेना नेते संजय राऊत काय म्हणाले ते की, “राजभवनातील कोरोनाची लागण गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. ‘परीक्षा घ्या’ हा आग्रह चुकीचा असल्याचं नियतीनं दाखवून दिलं आहे. राज्यपालांनी परीक्षेच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा”. असे त्यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षाच्या बाबतीत सूचक ट्विट राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाबतीत त्यांनी काय ट्विट केले पाहूया. ” राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ??? अशा प्रकारे भावनिक प्रश्न विद्यार्थ्यांच्या बाजूने महारस्त्रचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे !

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*