मंत्री झाले म्हणून शहाणपण येत नाही; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई :

मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यस्तरीय दौऱ्याला डिझॅस्टर टुरिझम असे म्हटलेले आहे. त्यावर फडणवीस यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, नया है वह.. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कोणालाही मंत्री करू शकतात. मात्र, केवळ कोणी मंत्री झाले म्हणून शहाणपण येतंच असं नाही. शहाणपण येण्यासाठी प्रश्न समजून घेण्याची इच्छा, आव्हानांची जाणीव, समाजाप्रती संवेदनशीलता आणि जनतेसाठी काम करण्याची तळमळ आवश्यक असते.

आता यावर आदित्य ठाकरे व शिवसेना फडणवीस यांना काय प्रत्युत्तर देते याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*