सोन्याचेच नाही, तर हिरेजडीत मास्कही आलेत; किंमत पाहून थक्क व्हाल

श्रीमंतीचा रुबाब मिरवण्याची भारतीयांसह विकसनशील देशातील नागरिकांना खूप इच्छा असते. लग्नात किंवा इतर समारंभात तसेच रोजच्या जीवनातही दागिने व उंची वस्तू मिरवण्यात भारतीय स्त्रियांसह पुरुषही मागे नाहीत. करोनाच्या निमित्ताने असाच प्रकार आता बाजारू अर्थव्यवस्थेने आणला आहे. सोन्याचे मास्क आता जुने झाल्याने थेट हिरेजडीत मास्क बाजारात आणण्याची शक्कल सराफा बाजाराने केली आहे.

सुरत या गुजरातच्या आर्थिक राजधानीत असे मास्क मिळत आहेत. सध्या करोना असला तरीही लग्नसमारंभ काही बंद नाहीत. अशावेळी एका नवरदेवाने सोन्याचा मास्क दाखवल्यावर यापेक्षा वेगळा आणि महाग मास्क नाही का, अशी विचारणा एका सराफा व्यावसायिकास केली. त्यावर त्याने सोन्याच्या मास्कला थेट हिरे जोडून देण्याची तयारी दाखवीत हे ग्राहक पटवले. त्यानंतर आता सुरतच्या बाजारात असे मास्क सहजपणे सगळ्या दुकानात मिळण्यास सरुवात झालेली आहे. दैनिक भास्कर माध्यम समूहाने ही बातमी दिली आहे. सुमारे ४ लाखापर्यंत अशा मास्कची किंमत शकते.

या मास्कला लावलेल्या सोने व हिरे यांना नंतर काढून घेऊनही वेगळे दागिने करणे शक्य आहे. मात्र, असा मास्क लावला म्हणून करोना होणारच नाही असे नाही. उलट एन ९५ हा मास्क योग्य पद्धतीने वापरूनच आपण करोना विषाणूचे संक्रमण रोखू शकतो. उलट असे महागडे मास्क घालून ते सांभाळणे आणि विषाणूचे संक्रमण होणे असे दुहेरी धोके आहेत. पण, जिथे भारतीय मंडळी करोनाला घाबरत नाहीत तिथे मास्क हरवण्याची त्यांना काय किंमत म्हणा..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*