पंतप्रधानही देतात गुन्हेगारांना संरक्षण; भाजप खासदाराचे धक्कादायक वक्तव्य

दिल्ली :

उत्तरप्रदेश राज्यातील कुप्रसिद्ध गँगस्टर विकास दुबे याचे एन्काऊंटर करण्याची घटना देशभरात चर्चेत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा राजकारण व गुन्हेगारी यांच्यातील संबंधावर बोलले जात आहे. त्याचवेळी भाजपचे रीवा येथील खासदार जनार्दन मिश्रा यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.

त्यांनी दुबे यांच्या एन्काऊंटरमधील हत्येचे समर्थन करताना म्हटले आहे की, उत्तरप्रदेश पोलिसांनी हे चांगले केले आहे. मात्र, राजकारण व गुन्हेगारी यांच्यातील संबंध सगळ्यांना माहित आहेत. राजकीय नेतेच गुन्हेगारांना मोठे करतात. अगदी सरपंच, मुख्यमंत्री असो नाहीतर पंतप्रधान असोत सगळेच गुन्हेगारांना संरक्षण देतात. अशाच राजकीय व्यवस्थेला आपण जन्म दिला आहे. यामध्ये सगळेच राजकीय नेते गुन्हेगारांशी संबंधित असतात. लोकप्रतिनिधी असेच असल्याने मग यंत्रणा गुन्हेगारांना मदत करून गुन्हेगार मोठे होतात.

त्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/reewa/vikas-dubey-encounter-bjp-mp-said-from-pm-to-sarpanch-protected-criminals/videoshow/76921387.cms

मूळ हिंदी बातमी वाचण्यासाठी यावर क्लिक करा : https://aajtak.intoday.in/story/rewa-bjp-mp-janardan-mishra-says-vikas-dubey-politician-patronize-criminal-1-1209407.html

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*