रेल्वे भरती बंद.. ‘त्या’ ९००० पदांना कात्री, तरीही लोकप्रियता कायम; वाचा रविश कुमार यांचा ब्लॉग

देशात सगळे काही चांगले चाललेले आहे. तरुणांना केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे. विरोधी राजकीय पक्षांना कोणते मुद्दे घेऊन लढावे तेच समजेनासे झालेले आहे. तर, रेल्वे भरती बंद केलेली आहे आणि संरक्षण विभागातील मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेसच्या ९ हजार पदांना कात्री लावलेली आहे. बेरोजगारी वाढत आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. हे फ़क़्त मोदी सरकार करू शकते. बाकी कोणाचेही हे काम नाही.

स्वैर अनुवाद : कृषीरंग; ब्लॉग लेखक : रविश कुमार, पत्रकार, एनडीटीव्ही

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही वाढती बेरोजगारी हा मुद्दाच असणार नाही. याबाबत एका विरोधी पक्षाच्या नेत्याला म्हटले तर त्यांनी ते समजून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. होय, त्यांना तरुणाईशी कनेक्ट होण्याचा मार्गच सापडलेला नाही. उलट शिकलेल्यांना मिळणाऱ्या सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत. खासगी क्षेत्रात तर नोकऱ्या अजिबात उरलेल्या नाहीत. हे सगळे माहित असूनही भारतातील तरुणाई मोदींवर विश्वास असल्याचे सांगत आहे. उलट दिवसेंदिवस त्यांच्यावरील विश्वास आणखी पक्का होत आहे.

यंदा करोना संकटात रेल्वेची भरती होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले आहे. तसेच मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेसच्या ९ हजारपदांना तर थेट कात्री लावलेली आहे. देशात सध्या लाखो इंजिनीअर बेरोजगार आहेत. त्यांनाही त्याचे काहीच वाटत नाही. सरकारी नोकर भरती होणार नाही किंवा पदांची संख्या कमी झाल्याची बातमी ऐकून तरुणांना वाईट वाटायला पाहिजे. परंतु, त्यांना तसे काहीही वाटत नाही. अशा पोटापाण्याच्या बातम्या किंवा माहिती ते अजिबात शेअर करीत नाहीत. सोशल मिडीयावर विरोधी पक्षांचे मिम्स आणि इतर काही माहिती व ट्रोलिंग शेअर होत आहे. विरोधी पक्षांनी तरीही समजून घेतलेले नाही.

अशा पद्धतीने आता बिहारच्या निवडणुकीत बेरोजगारी हा मुद्दाच असणार नाही. युवकांना शेअर करण्यासाठी रोज नवनवीन मिम्स आणि इतर माहिती येईल. ते ती आनंदाने शेअर करतील आणि आपल्याला कोणतेही दु:ख आहे याचाच त्यांना विसर पडलेला असेल. लोकप्रियता काही कमी होणार नाही. उलट ती वाढेल..!

ता.क. : या लेखातील मुद्दे व आकडेवारी ही लेखक रविश कुमार, पत्रकार, एनडीटीव्ही यांनी ब्लॉगमध्ये लिहिलेली आहे. त्यावरून हे मांडलेले आहे. त्याचा कृषीरंग संस्थेशी काहीही संबंध नाही.

मूळ ब्लॉग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://khabar.ndtv.com/news/blogs/ravish-kumar-writes-over-9000-engineering-posts-in-army-were-abolished-enthusiasm-among-youth-2261442?pfrom=home-topstories

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*