उजाला योजनेतून देशाला झाला ‘हा’ महत्वपूर्ण फायदा..!

दिल्ली :

प्रधानमंत्री उजाला योजना म्हणजे सर्वांना कमी किमतीत एलईडी बल्ब उपलब्ध करून देणारी योजना. या योजनेद्वारे देशातील विजेची बचत होण्यासह कार्बन उत्सर्जन कमी झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

केंद्राच्या माहितीनुसार भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावर याची एक खास पोस्ट शेअर करण्यात आलेली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, या योजनेतून देशभरात 36.26 करोड़ LED बल्ब वितरीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रतिवर्षी 47,102 mn kWh अर्थात 18,841 कोटी रुपयांच्या विजेची बचत होत आहे. तसेच यामुळे 3.81 करोड़ टन प्रति वर्ष CO2 उत्सर्जन कमी झालेले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*