त्यांनी आदित्य ठाकरेंना म्हटले घरकोंबडा; वाचा काय आहे संदर्भ

मुंबई :

मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यस्तरीय दौऱ्याला डिझॅस्टर टुरिझम असे म्हटले होते. त्यावर फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना ‘नया है वह’ असा टोला लगावला आहे. तर, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी त्यांना थेट घरकोंबडा म्हटले आहे.

वाघ यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे की, मंत्री असुनही स्वत: घरकोंबड्यासारख घरी बसायचं व जनतेची सेवा करत राज्यभर फिरणाऱ्या विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांच्यावर ‘Disaster Tourism’ म्हणुन टिका करायची हा निव्वळ पोरकटपणाच आहे. अशी टिंगल टवाळी करणाऱ्या @AUThackeray ना जनताच योग्य ते उत्तर देईल.

त्यावर नेहमीप्रमाणे वाघ यांना काहींनी मुद्देसूद प्रश्न विचारले आहेत तर काहींनी थेट ट्रोल केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*